scorecardresearch

पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhansabha) हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाद्वारे राज्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, राज्यातील विविध प्रश्नांवर, गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनाद्वारे केलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी, राज्यहितासाठी आवश्यक असलेली नवीन धोरणे राबवण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी विधानसभेद्वारे वर्षामध्ये तीन वेळा अधिवेशनाचे नियोजन केले जाते.


उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ३ ऋतुंच्या वर्गीकरणाप्रमाणे उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे प्रकार पडतात. त्यातील उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन हे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात पार पाडले जाते. तर हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आयोजित केले जाते. यावर्षी १७ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर अजित पवारांनीही बंडाची भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आधी विरोधी पक्ष नेते ही जबाबदारी सांभाळणारे अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने आता विरोध पक्ष नेता कोण असा प्रश्न विरोधी पक्ष गटातील नेत्यांना पडला. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज सुरु होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या विजय वड्डेटीवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली.


विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा सोडल्यास अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील प्रचारांनी गाजले. या व्यतिरिक्त जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ, सहकारी संस्थांमध्ये सदस्याच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसुदा सादर करण्याच्या कालावधीत वाढ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, मुंबई महापालिका सुधारणा, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, ललित कला शिक्षण मंडळ विधेयक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा देखील झाली. हे अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपले.


Read More
Maharashtra Assembly Monsoon Session 2025
9 Photos
Photos: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात; शेतकरी कर्ज माफी, हिंदी भाषेवरून विरोधक आक्रमक

Maharashtra News Today: सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत.

Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra News Highlights : भाजपाला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, रविंद्र चव्हाणांनी भरला अर्ज, मंगळवारी होणार अधिकृत घोषणा

Maharashtra Politics Highlights: राज्यातील सर्व राजकीय आणि पावसाळी अधिवेशनातील सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

mahavikas aghadi criticism bjp goverment over adani land grab and corruption in maharashtra
भाजपचे महाराष्ट्र विरोधी धोरण – विरोधकांचा आरोप, चहापानावर बहिष्कार

सोमवारपासून सुरु होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज ‘अजिंक्यतारा’ या अंबादास दानवे यांच्या शासकीय…

mahavikas aghadi criticism bjp goverment over adani land grab and corruption in maharashtra
हिंदी, शक्तिपीठ, जनसुरक्षा कायदा अधिवेशनात गाजणार, सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याने भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिपीठचा विषय उपस्थित केला जाणार आहे.

Sudhir Kene meeting with Sumnit Wankhede about mobile ban issue
राज्यात शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी? शिक्षक सुधीर केनेंच्या संशोधनातून धक्कादायक…

महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात यावी, यासाठी आर्वी मतदार संघाचे आमदार सुमीत वानखेडे येत्या पावसाळी अधिवेशनात…

Parliament monsoon session
संसद अधिवेशनाच्या तारखा जाहीर, विशेष सत्राच्या विरोधकांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष

केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या मागणीला केंद्राने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले.

न्यायाधीश यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ, सरकार महाभियोग प्रस्ताव आणण्याची शक्यता

१४ मार्च रोजी आग लागली तेव्हा न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी चलनी नोटा सापडल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने…

Government determined to introduce Public Safety Bill in Monsoon Session
वादग्रस्त जनसुरक्षा कायदा पावसाळी अधिवेशनातच! सरकारचा निर्धार; विरोधक, स्वयंसेवी संस्थांचा आक्षेप

वादग्रस्त ठरलेले जनसुरक्षा विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाईल व मंजूर केले जाईल, असे सरकारच्या वतीने बुधवारी स्पष्ट करण्यात आले.

Parliament Monsoon Session 2024 Lok Sabha Live
Parliament Monsoon Session Live: लोकसभेचं कामकाज Live | Loksabha

संसदेच्या अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. या दरम्यान विविध मुद्द्यांवर संसदेत गदारोळ माजलेला पाहायला मिळाला. विविध विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा…

Rajya Sabha Monsoon Session 2024
Rajya Sabha Monsoon Session 2024: राज्यसभेचं कामकाज Live |Rajya Sabha

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. कामकाजाच्या सातव्या दिवशी राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.

Parliament Monsoon Session 2024 Lok Sabha Live
Parliament Monsoon Session 2024: लोकसभेचं कामकाज Live | Loksabha

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहात चर्चा झाली. दरम्यान काँग्रेस…

Parliament Monsoon Session 2024 Lok Sabha Live
Parliament Monsoon Session 2024 Live: लोकसभेचं कामकाज Live

संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. काही नव्या घोषणा यावेळी…

संबंधित बातम्या

OSZAR »