Tharala Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या जबरदस्त प्रोमोमुळे सध्या सर्वत्र अर्जुन सुभेदार लढत असलेल्या विलास मर्डर केसची चर्चा होत आहे. जुलै महिन्यात प्रेक्षकांना या मालिकेत कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या विलास मर्डर केसचा निकाल अखेर जुलै महिन्यात जाहीर केला जाणार आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन गेल्या अनेक महिन्यांपासून विलास मर्डर केसचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतोय. अशातच त्याला साक्षी शिखरेचं पेडंट सुद्धा सापडलं आहे. हा पुरावा सापडल्यावर सायली-अर्जुन प्रचंड आनंदी होतात. पण, कोर्टात एक नवीन ट्विस्ट येणार आहे.

विलास मर्डर केस सुरू होऊन आता २ वर्षे उलटली आहेत. हा खटला दोन वर्षांपासून सुरूच आहे, अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत आता अजून उशीर नको, अशी ठाम बाजू दामिनी कोर्टात मांडते.

यामुळे कोर्टाकडून एक महत्त्वाचा आदेश दिला जातो. “जुलै महिन्यात या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच” असं स्पष्ट केलं जातं. यामुळे आता अर्जुन-सायलीच्या हातात फक्त ३० दिवस उरले आहेत. अर्जुनला ३० दिवसांत सगळे पुरावे गोळा करून कोर्टासमोर ठामपणे बाजू सिद्ध करावी लागणार आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेचं मूळ कथानक आश्रमाच्या केसभोवती फिरतं त्यामुळे निकाल ३० दिवसांत लागल्यावर ही मालिका संपणार का? असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. याबाबत सर्वत्र चर्चाही रंगल्या होत्या.

अखेर जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मालिका संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सायली आणि मधुभाऊ फोटोसाठी एकत्र पोझ देत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली कॅप्शनमध्ये लिहिते, “मधुभाऊ आणि त्यांची लाडकी साऊ! ‘ठरलं तर मग’ मालिकेत विलास खून खटल्याचे शेवटचे ३० दिवस… मालिका संपत नाहिये, पण केसचा निकाल मात्र नक्की लागतोय! त्यामुळे दररोज रात्री ८.३० वाजता मालिका बघायला विसरू नका”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका संपत नसल्याने सध्या चाहत्यांच्या जीव भांड्यात पडला आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता या ३० दिवसांत अर्जुन की दामिनी कोण बाजी मारणार? केस कोण जिंकणार? साक्षी, प्रिया आणि महिपतला शिक्षा होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.