चंद्रपूर : हसत खेळत शिक्षण घेवून मोठं होण्याची स्वप्न बघणाऱ्या पूर्वा नरेश बोरीकर (१८) या तरुणीने जीवघेण्या कॅन्सरशी लढा देत बारावीची परिक्षा ६८ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली आहे. उपचारानंतर ब्लड कॅन्सरवर मात देण्याची चिन्हे दिसू लागली असतांनाच पुन्हा अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठीचा खर्च आहे ३० लाख रुपये. अभ्यासात हुशार असलेल्या पूर्वाने या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

नागपूर येथील रुग्णालयात पूर्वावर उपचार सुरू आहेत. जिद्द आणि आत्मविश्वासाने कॅन्सरशी लढा देणा-या पूर्वाने हार मानलेली नाही. मात्र, तीच्या हिंमतीला समाजातील देणगीदारांकडून आर्थिक बळाची, मदतीची गरज आहे. या मदतीसाठी आई, वडील व कुटुंबीय दिवसरात्र एक करित आहेत. विशेष म्हणजे, पुर्वा ही गुणी मुलगी. अभ्यासात हुशार. कुठलेही संकट आले तरी धैर्याने लढणारी. दहावी उत्तीर्ण, महाविद्यालयीन जीवनात तिने प्रवेश केला. मात्र तिला ‘ब्लड कॅन्सर’ असल्याचे निदान झाले. आई-वडिलांच्या पायाखालची मातीच सरकली.

मात्र, पूर्वा ही लढणारी. ती खंबीर राहून आणि आई-वडिलांनाच दिलासा देत राहिली. मागील १६ महिन्यांपासून पुर्वा  Acute Lymphoblastic Leukemia (ALL) या गंभीर प्रकारच्या ब्लड कॅन्सरशी झुंजतेय. तिच्यावर किमोथेरपी आणि रक्त संक्रमण अशा अत्यंत वेदनादायक उपचारांचा मारा सुरू आहे. या स्थितीतसुद्धा पूर्वाने १२ वीची परीक्षा ६८% गुणांनी उत्तीर्ण करत तिच्या इच्छाशक्तीची ताकद दाखवून दिली. इच्छाशक्ती आणि योग्य उपचाराच्या बळावर अनेकांनी कॅन्सरवर मात केलेली उदाहरणे आहेत. पूर्वादेखील यातून आत्मविश्वासाने बरी होईल असेच वाटत होते.

मात्र, अलीकडेच तिची प्रकृती पुन्हा बिघडली. आता तिला Bone Marrow Transplant (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) हा उपाय तात्काळ करावा लागणार आहे. डॉक्टरांच्या मते ही प्रक्रिया लवकरात लवकर न केल्यास धोका वाढू शकतो. या उपचाराचा एकूण खर्च सुमारे ३० लाख रुपये येणार आहे. तिच्या भावाचा रक्तनमुना चेन्नई येथे पाठवण्यात आला आहे, आणि जर तो जुळला तर ट्रान्सप्लांट लगेच करणे अत्यावश्यक आहे. पूर्वाचे वडील नरेशकुमार बोरीकर हे प्राथमिक शिक्षक. चंद्रपुरातील साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत ते सक्रिय आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पाठबळ देत त्यांनी उभे केले.

मुलींसाठीही त्यांनी यापूर्वीच उपचारांसाठी जवळपास २० लाख रुपये खर्च केले. हे पैसे त्यांनी नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून आणि कर्ज घेऊन उभे केले. आता पुन्हा ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ म्हणजेच अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी ३० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च उपचारासाठी येणार आहे. त्यामुळे कुटूंबिय हतबल झाले आहे .

पूर्वाच्या आयुष्याला आपण एक नवं भविष्य देऊ शकतो. पुर्वाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी खालील अकाउंटवर व फोन / गुगल पे करून सहकार्य करू शकता.

मदतीसाठीची बॅंक डिटेल्स

Account Name : Naresh Keshaorao Borikar

Bank Name : AU SMALL FINANCE BANK

A/C No : 2011236729092462

IFSC Code : AUBL0002367

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 Phone Number : 9834846815