-
खाण्याची इच्छा नसेल किंवा बाहेरून काहीतरी खाऊन आल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण रात्रीचे जेवण तर कंटाळा करून कधी सकाळचा नाश्ता स्किप करतात. पण, नाश्ता किंवा रात्रीचे जेवण स्किप करणे ही गोष्ट चांगली आहे का? तर मल्हार गानला यांच्या मते, रात्री जेवणे टाळा. पण, नाश्ता स्किप करू नका. कारण – त्याचा काहीही उपयोग होत नाही. यामुळे अनेकदा तुम्हाला सतत भूक लागते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
रात्रीच्या जेवणानंतर ८-१० तास काहीच न खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर कमी होईल. शरीरात ऊर्जा उपलब्ध राहत नसल्यमुळे दुपारी १ वाजेपर्यंत पॅनिक व्हाल त्यानंतर संध्याकाळी ५ आणि त्यानंतर ८ वाजता पुन्हा पॅनिक व्हाल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर रात्री जेवणात जास्त प्रमाणात खाल्ल्याने नुकसान सुद्धा होईल ; म्हणजेच दिवस जसजसा पुढे जाईल, तसतशी चिंता वाढत जाईल आणि शेवटी रात्री जेवणात तुमच्याकडून जास्त प्रमाणात खाल्लं जाईल आणि तिथून खरी समस्या निर्माण होईल ; असे गानला यांनी इंस्टाग्रामवर लिहिले. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर, नाश्त्यापेक्षा रात्रीचे जेवण स्किप करणे चांगले आहे की, नाही याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्सप्रेसने दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या वरिष्ठ पोषणतज्ज्ञ दिव्या मलिक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, नाश्त्याऐवजी रात्रीचे जेवण वगळल्याने संभाव्य फायदे देऊ शकतात. पण, ही गोष्ट पूर्णपणे व्यक्तीच्या जीवनशैलीवर, आरोग्य स्थितीवर आणि दैनंदिन दिनचर्येवर अवलंबून असते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. कारण – नाश्ता चयापचय सुरू करण्यासाठी आणि रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळी शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
नाश्ता न केल्याने थकवा, एकाग्रता कमी होणे, दिवसाच्या उत्तरार्धात भूक वाढते ; ज्यामुळे अनेकदा अस्वस्थ अन्न आपण निवडतो. याउलट रात्रीचे जेवण वगळल्याने कॅलरीजचे प्रमाण कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते. कारण – रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढणे, अॅसिड रिफ्लक्स आणि झोपेची गुणवत्ता खराब होण्यास मदत होते. पण, तरीही प्रत्येकाने रात्रीचे जेवण वगळू नये असा सल्ला दिव्या मलिक यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गर्भवती महिला, मुले आणि मधुमेहासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना दिवसभर पोषणाची आवश्यक असते. त्यांच्यासाठी, रात्रीचे जेवण न घेतल्याने उर्जेची पातळी कमी होऊन पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते ; असे दिव्या मलिक यांनी सांगितले आहे. जर रात्रीचे जेवण तुम्ही वगळणार असाल तर हायड्रेटेड राहणे आणि दुसऱ्या दिवशी जास्त खाणे टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण जेवणार असाल तर संतुलित जेवण निवडा, जसे की लीन प्रोटीन असलेले सॅलड किंवा संपूर्ण धान्याचे सूप. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
जर रात्रीचे जेवण तुम्ही वगळणार असाल तर हायड्रेटेड राहणे आणि दुसऱ्या दिवशी जास्त खाणे टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण जेवणार असाल तर संतुलित जेवण निवडा, जसे की लीन प्रोटीन असलेले सॅलड किंवा संपूर्ण धान्याचे सूप. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मग काही लोक इंटरमिटेंट फास्टिंग करतात त्यांचे काय? जे लोक इंटरमिटेंट फास्टिंग उपवास करतात किंवा वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. फक्त त्यांच्यासाठीच रात्रीचे जेवण न करणे फायदेशीर ठरू शकते, पण, पोषक तत्वांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी डॉक्टरांकडून योग्य ते मार्गदर्शन घेतले पाहिजे. (फोटो सौजन्य: @Freepik)

हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’