-
Air India Ahmedabad Plane Crash 2025: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेने देश हादरला आहे. (Express Photo Bhupendra Rana)
-
या विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या विमान दुर्घटनेत १२ क्रू मेंबर्स होते. (Express Photo Bhupendra Rana)
-
अहमदाबादवरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच झालेल्या अपघात एअर इंडियाच्या विमानातील क्रू मेंबर्स पैकी एक असलेले कॅप्टन सुमित सभरवाल हे होते. (Express Photo Bhupendra Rana)
-
सुमित सभरवाल हे गेल्या काही वर्षांपासून पायलट म्हणून काम करत होते.
-
सुमित सभरवाल हे त्यांच्या ९० वर्षीय वडिलांबरोबर पवईतील जलवायू विहारमध्ये राहत होते.
-
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सपैकी एक बदलापूर येथील फ्लाइट अटेंडंट दीपक पाठक हे देखील होते.
-
११ वर्षांहून अधिक काळ एअरलाइन्समध्ये कामाचा त्यांना अनुभव होता.
-
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये ३५ वर्षीय सायनीता चक्रवर्ती यांचाही समावेश होता.
-
एअर इंडियातील या अपघातग्रस्त विमानामधील असलेल्या क्रूपैकी या एक होत्या. (Express Photo Bhupendra Rana)
-
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात पनवेलमधील न्हावा गावातील २४ वर्षीय फ्लाइट अटेंडंट मैथिली मोरेश्वर पाटील यांचाही समावेश होता.
-
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात डोंबिवलीतील २७ वर्षीय रोशनी राजेंद्र सोनघरे हिचाही समावेश होता.
-
रोशनी राजेंद्र सोनघरे विमानात असलेल्या क्रू मेंबर्सपैकी ही एक होती.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा भाचा अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा महाडिक या एअर इंडियाच्या विमानात क्रू सदस्य म्हणून कार्यरत होत्या.
-
अपर्णा यांचे पती अमोल हेदेखील स्वतः एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून काम करतात, अशी माहिती समोर आली आहे. (Express Photo Bhupendra Rana)
-
या विमानात केबिन क्रू मेंबर म्हणून सेवा देणारे संत तुकाराम नगर (पिंपरी) येथील इरफान शेख यांचेही निधन झाले.

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल