-
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Updates in Marathi: आजपासून (३० जून) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे.
-
हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत (Maharashtra Monsoon Session) असणार आहे.
-
त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
-
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत.
-
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रद्द केला.
-
राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला असला तरी या मुद्यावरून देखील विरोधक सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे.
-
तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफी, शक्तिपीठ महामार्गाचा विषय, लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० ऐवजी २१०० रुपयांचं दिलेलं आश्वासन यासह आदी महत्वाच्या विषयांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
-
दरम्यान, आज विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला, त्यानंतर हा प्रस्ताव संमत झाल्यानंतर आजच्या दिवसभराचं कामकाज संपलं आहे.
-
(सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

Raj Thackeray PC News: “परत सरकार अशा भानगडीत…”, राज ठाकरेंची हिंदीबाबतच्या निर्णयानंतर भूमिका; म्हणाले, “मोर्चा निघाला असता तर…”