नारायणगाव : मोटरसायकल चोरी करणाऱ्याला चोरट्याला सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासून २४ तासांत नारायणगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली. निखिल नवनाथ मुळे (वय २९, रा. गुंजाळवाडी , ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नारायणगाव येथील वाजगे आळीतील मनोज वसंतलाल दर्डा यांचे घरासमोर उभी केलेली मोटरसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासले. त्यानंतर मुळे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोटरसायकल जप्त करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,जगदेव पाटील, सोमशेखर शेटे यांनी ही कामगिरी केली.