Crocodile River Shocking Video : मगर हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. एका फटक्यात तो समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करू शकतो. त्यामुळे मगरीला पाण्यातील सर्वांत हिंसक प्राणी मानले जाते. तिच्या ताकदीसमोर भल्याभल्या प्राण्यांची ताकदही फोल ठरते. त्यामुळे अनेक प्राणी मगरीसमोर जाण्यास घाबरतात. सध्या शेकडो मगरींनी भरलेल्या नदीचा असाच एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यातील एका तरुणाचं धाडस अन् निर्भयता पाहून तुम्हाला धक्का बसेल.
नदीत एक-दोन मगरींचा वावर आहे, असं सांगितले तरी त्या नदीत उतरण्याचं धाडस सहसा कोणी करत नाही. पण या व्हिडीओत एक तरुण मात्र शेकडो मगरींनी भरलेल्या नदीत बोटीवर बसून आरामात प्रवास करतोय. तो न भिता अतिशय आरामात बोट चालविण्याचा आनंद घेतोय, त्या पाण्यात एकाच वेळी शेकडो मगरी घोळका करून बसल्या होत्या. चुकूनही तो नदीत पडला असता, तर त्याचा निश्चित मृत्यू झाला असता. पण सुदैवानं असं काही होत नाही. तो तरुण सुसाट बोट घेऊन निघालाय, ज्यामुळे तो घाबरण्यापेक्षा मगरीच त्या बोटीच्या स्पीडला घाबरून नदीच्या काठावर पळताना दिसतायत.
मगरींचा हा धडकी भरविणारा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांनी व्हिडीओला लाइकदेखील केले आहे. तर अनेक जण कमेंट्स करीत आहेत. एका युजरनं लिहिलं की… हेच कारण आहे की, महिला पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात. दुसऱ्यानं लिहिलं की, मगरी माणसांपेक्षा जास्त सुसंस्कृत असतात. तर तिसऱ्या एकानं लिहिलं की, भाऊ, तुम्हाला भीती वाटत नाही का?