Viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली घटना पाहून प्रत्येकजणांचा संताप होत आहे. एका नवऱ्यानं आपल्या बायकोला अमानुष मारहाण केली आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. जोडप्यामधील एकाने दुसऱ्यासोबत अतिशय धक्कादायक कृत्य केल्याच्या किंवा हत्या केल्याच्याही घटना समोर येत असतात.

मात्र घरातील अशा गोष्टींमुळे किंवा पालकांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यात आपापसात भांडणे होतात. जे की सामान्य गोष्ट आहे. मात्र ही भांडणे मुलांसमोर करणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोक्याची ठरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आई-वडिलांच्या भांडणामध्ये मुलांचे कसे हाल होतात हे पाहायला मिळालं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बंद घरात हा व्यक्ती आपल्या बायकोचा छळ करत आहे. सुरुवातीला त्यांच्यामध्ये शा‍ब्दिक वाद सुरु होता. मात्र काहीच वेळात नवऱ्यानं बायकोला मारायला सुरुवात केली, यावेळी लहान मुलंही वडिलांना थांबवताना दिसत आहेत. मात्र तरीही हा व्यक्ती आपल्या बायकोला मारहाण करतोय. अतिशय निर्दयीपणे बायकोला कानशिलात लगावतो. त्यानं इतक्या जोरात तिला मारलं की ती अक्षरश: भींतीवर आपटते. यानंतर एक महिला त्या व्यक्तीला थांबवण्यासाठी मध्यस्थी करते मात्र तो तिचंही ऐकत नाही. तो तसाच आपल्या बायकोला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. यावेळी कुणीतरी लपून या घटनेचा व्हिडीओ काढला असून आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यानं थेट तिचा गळाच पकडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम parivartan_news वरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, “हे कसलं प्रेम? एका युजरने म्हटले आहे की, “नवरा म्हणून हरलास पण बाप म्हणूनही हरलास”