Viral video: डोंगर, दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडतं नाही. धबधब्यांवरून कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मज्जा असते पण फोटो, रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेली आहे. जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसत आहे.पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचतात. काही जण समुद्रकिनारी जातात, बोटिंगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूनही पर्यटक ऐकत नाहीत. काही वेळेला समुद्राला भरती आलेली असते, तरीही पर्यटक नसतं धाडस करतात आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण महाकाय लाटांबरोबर वाहून जाताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आणि तरणाच्या मैत्रीणी त्याला वाचवलं आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल याला म्हणतात मैत्री..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, समुद्रा भरती आली आहे आणि प्रचंड मोठ्या लाटा किनाऱ्यावर येत आहे. याच लाटांमध्ये एक तरुण अडकला असून त्याची मैत्रीण त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र या लाटांसमोर कुणाचाच टीकाव लागत नाहीये, परिस्थिती अशी आहे की, वाचवण्यासाठी जाणारे सुद्धा वाहून जातील. तरीही ही तरुणी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समुद्रात जात आहे. एकदा तरुणाला तीनं बाहेर खेचलंही मात्र पुन्हा मोठी लाट आली आणि तरुण समुद्रात गेला. इतर लोकही या तरुणीला मदत करताना दिसत आहेत, शेवटी तरुणी पुन्हा आतमध्ये जाते आणि मित्राला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करते यावेळी तिचा हा प्रयत्न यशस्वी होतो आणि अखेर ती तिच्या मित्राचा जीव वाचवते.
पाहा व्हिडीओ
तरुणीनं दाखवलेल्या धाडसामुळे या त्याचा जीव थोडक्यात बचावला अन्यथा मोठा अपघात झाला असता. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकतं हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर hellomurtizapur नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या व्हिडीओप्रमाणेच अनेक व्हिडीओ सोशल मीडियामुळे अनेकदा समोर येतात.