Shocking Video: सोशल मीडियावर दररोज लाखोंच्या संख्येने व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ पाहून आपल्याला प्रश्न पडतो की, माणुसकी अजूनही जिवंत आहे का? या स्वार्थीपणाच्या शर्यतीत माणसं दुसऱ्यांचा विचार करायला विसरलीत का? असादेखील प्रश्न पडतो.

आजच्या या डिजिटल युगात अनेक वाईट गोष्टी घडताना आपण रोज बघतो पण याचे व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते पाहून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडनांबद्दल आपल्याला कळतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात दुचाकीवर असलेला एक तरुण एका माणसाला फरफटत नेताना दिसतोय. नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊ या…

दुचाकीस्वाराने फरफटत नेलं अन्… (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण भर वेगात स्कूटर चालवताना दिसत आहे. त्याच्या स्कूटरच्या मागच्या बाजूला एक माणूस लटकलेला दिसतोय. पण तसंच त्या माणसाला फरफटत नेत तरुण स्कूटर चालवताना दिसत आहे. हे पाहून एक रिक्षाचालक स्कूटरसमोर येऊन त्याची स्कूटर थांबवतो. स्कूटर थांबताच तरुण खाली उतरतो आणि आजूबाजूला गर्दी जमा होते. काहीजण त्याला जाबदेखील विचारताना दिसत आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली, हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @manishadhavale37 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “तुम्हीच सांगा अशा माणसाचं काय केलं पाहिजे” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.  तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच याला ५ लाखापेक्षा जास्त व्हयुज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “ऑटो ड्रायवरची कमाल आहे” तर दुसऱ्याने “याला ट्रकला बांधून ओढले पाहिजे… वयाचा विचार का करत नाही लोक काय माहित” अशी कमेंट केली. तर एकाने “या कलियुगात तुम्ही किती खालच्या थराला जाल, माणसं नाही जनावर झाले आहेत सगळे.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अरे, इतका निर्दयीपणा येतो कुठून”