Man Misbehaves in front of Women Video: जगभरात वर्षानुवर्षे महिलांवरील अत्याचारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळ्याच वयोगटाने असा अमानुष अत्याचार सहन केला आहे. सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना आपण पाहत असतो. सध्या असाच अश्लीलतेची सीमा पार करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय? (Man Touches his Private Part in front of Women)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या पॅंटवर हात फिरवून अश्लील कृत्य करताना दिसतोय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये महिलेने सविस्तर घटना सांगितली. ती म्हणाली, “मी भारतातल्या आणि आशियातल्या सर्वात मोठ्या बसस्थानकात बसले होते – पूर्णपणे कुर्ती, लेगिंग्ज आणि शाल घालून. मी माझ्या कॅबची वाट पाहत होते. तेव्हा अचानक एक माणूस तिथे आला आणि जवळ बसलेल्या काही महिलांसमोर जाऊन बसला. थोड्या वेळातच मला दिसलं की तो काहीतरी घाणेरडं कृत्य करत होता – तो बिनधास्तपणे त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हात फिरवत होता आणि त्या महिलांकडे बघत होता. जेव्हा एखादी महिला उठून जात होती, तेव्हा तो दुसऱ्या महिलेकडे बघायचा, तिच्यासमोर जाऊन बसायचा आणि परत तेच घाणेरडं कृत्य करायचा.
हे एकदाच झालं असतं तर ठीक, पण तो पुन्हा पुन्हा तसंच करत होता – मुद्दाम आणि घाणेरड्या हेतूनं. नंतर तो माझ्यासमोर येऊन बसला. सुरुवातीला मला काही कळलंच नाही, पण लक्ष गेल्यावर मला खूपच त्रास झाला – भीती वाटली, राग आला आणि मन अजूनही अशांत झालं.
त्याच वेळेला एक पोलीस ऑफिसर माझ्या जवळून गेला होता आणि मी विचार करत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे, पोलीस तर आताच समोरून गेले. मग मी लगेच उठले आणि त्याच्यापासून दूर जाऊन पोलिसांना शोधू लागले. तो माणूस मात्र परत इतर महिलांजवळ जाऊन तसंच वागत राहिला – मोठ्या महिलांपासून ते अगदी लहान मुलींपर्यंत.
हे वागणं खूप भयंकर होतं – असं वागताना त्याला कोणतीही भीती वाटत नव्हती. तो निःशंक होता, त्याला लाज वाटत नव्हती आणि हेच एखाद्या भविष्यातील अत्याचार करणाऱ्याचं वागणं वाटत होतं. मी बघितलं की त्याने खूप महिलांना टार्गेट केलं होतं.
मी ठरवलं की मी गप्प बसणार नाही. मी त्याच्यावर लक्ष ठेवत राहिले आणि जवळच्याच दुकानात जाऊन विचारलं, “इथे पोलीस कुठे असतील?” त्यांनी काळजीपूर्वक विचारलं, काय झालं आहे. मी त्याला दाखवून सांगितलं. तेवढ्यात त्याने पाहिलं की मी त्याच्याकडे बोट दाखवत आहे, आणि तो लगेच पळून गेला.
तेवढ्यात मला तो पोलीस ऑफिसर पुन्हा दिसला. मी त्याच्याकडे धाव घेतली आणि सगळं स्पष्ट सांगितलं. त्याने एक क्षणही न घालवता माझ्यासोबत आला. पण तोपर्यंत तो माणूस निघून गेला होता.
मी त्याचं नीट वर्णन दिलं – गुलाबी शर्ट घातलेला माणूस, जो महिलांसमोर अश्लील आणि घाणेरडं कृत्य करत होता. पोलिसांनी मला आश्वासन दिलं – तो सुटणार नाही, आम्ही शोध घेऊ आणि त्याच्यावर कारवाई करू. जाताना त्यांनी मला आपला नंबर दिला आणि सांगितलं, अशा प्रकारची कुठलीही अडचण झाली, तर मला लगेच कॉल करा.
माझी कॅब आली आणि मी निघाले. पण मनात खूप अस्वस्थता होती – कारण तो माणूस पळून गेला होता. मी सारखं विचार करत होते – तो पुढे एखाद्या महिलेला त्रास तर देणार नाही ना? अशा वागणुकीमागे असलेली मानसिकता खूपच धोकादायक असते.
आपण बघतो आणि अनुभवतो – हे रोजचं झालंय आता. स्त्रिया घराबाहेर असो वा घरात – कुठेच सुरक्षितता उरलेली नाही. आपण सगळ्यांनीच हे अनुभवलेलं आहे. जोपर्यंत देशात कडक कायदे आणि कठोर शिक्षा होणार नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत.”
अश्लीलतेचा व्हिडीओ व्हायरल (Shocking Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @pavis__voice_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मला सांगा मी याच्याबरोबर काय केलं पाहिजे” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २.२ मिलियन व्हयुज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हा व्हिडिओ पोलिस स्टेशनमध्ये जाऊन दाखवा आणि तक्रार करा.” तर दुसऱ्याने “तिथल्या तिथे त्याला दोन कानाखाली द्यायला हवी होती” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अशांना चोपलंच पाहिजे”