भुतदया म्हणजे मुक्या प्राण्यांवर दया करणे, त्यांची काळजी घेणे. त्यांच्यावर प्रेम करणे. आजच्या काळात माणासातील माणुसकी, दयाभाव हरवत चालला आहे. प्राण्यांवर प्रेम करण्याऐवजी लोक त्यांना अमानुष मारहाण करत आहेत. प्राण्यांवर अत्याचार करत आहे. सोशल मीडियावर प्राण्यावर होणाऱ्या अत्याचाराचे कित्येक संतापजनक व्हिडिओ समोर येत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका कुत्र्याच्या पिल्लाला अमानुष मारहाण आहे. हे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. पण तिथेच उपस्थित असलेल्या तरुणाला हे अमानुष कृत्य पाहून राग अनावर होतो अन् तो मदतीसाठी धावून येतो.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका रस्त्यावर असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला एक माणूस लाथ मारून बाजूला फेकत असल्याचे दिसते. त्यानंतर तो माणूस लाथ मारताना दिसत आहे. त्यानंतर तो त्याला हातात उचलतो अन् जोरात चापट मारताना दिसत आहे. हे दृश्य पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून येते. रस्त्यावरून जाणारा एक तरुण अमानुष कृत्य पाहून संतापतो अन् कुत्र्याला मारहाण करणार्याच्या माणसाला मारहाण करतो. अन् जोरदार धक्का देऊन त्याला जमिनीवर पाडतो. कुत्र्याला मारहाण केल्याबद्दल त्याचा चोप देतो. स्थानिक लोक धावत येतात अन् वाद मिटवतात. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. कुत्र्याच्या पिल्लाला अशी मारहाण कशी काय केली जाते हे पाहून अनेकांनी दुख व्यक्त केले.
व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण करणाऱ्या माणसाला अद्दल घडवल्याबद्दल तरुणाचे कौतुक केले आहे तर अनेकांनी कुत्र्याच्या पिल्लावर अत्याचार केल्याबद्दल राग व्यक्त केला. व्हिडिओ nation_first_in_ नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, श्नानप्रेमीसमोर असे कृत्य करू नका, ते तुम्हाला सोडणार नाही.
अनेकांनी या कॅप्शनवर देखील टिका केली. श्नानप्रेमीसमोर नव्हे कोणासमोरही असे कृत्य नाही केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “त्या व्यक्तीने आधी परिस्थिती काय आहे याचे निरीक्षण केले अन् ताबडतोब त्याने कृती केली हे आवडले. त्या तरुणाला सलाम.”
हा व्हिडिओ श्वानप्रेमाबद्दल नाही तर माणूसकीबद्दल आहे जी आज माणसांमध्ये कमी होत चालली आहे. असे मत दुसऱ्याने व्यक्त केले.
“श्नानप्रेमी असो किंवा नसो, फक्त माणूसकी असली पाहिजे” असे मत एकाने व्यक्त केले.