Viral Video : साडी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. साडीमध्ये कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य खुलून उठते. कोणताही सण असो, स्त्रियांना साडी नेसायला आवडतं. फक्त विवाहितच नाही तर अनेक तरुणी सुद्धा आवडीने साडी नेसून मिरवतात. आपल्या आजूबाजूला अनेक महिला साडी नेसतात त्यामुळे आपल्याला त्याचे फारसे कौतुक वाटत नाही पण जगात असे काही देश आहे जिथे तुम्ही रस्त्यावर साडी नेसून फिरत असाल तर तुमच्याकडे थक्क होऊन बघणार. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी साडी नेसून जपानमध्ये रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिला पाहून जपानचे नागरिक कशी प्रतिक्रिया देतात, हे या व्हिडीओमध्ये कैद केले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला लाल साडी नेसलेली एक सुंदर तरुणी दिसेल. ती लाल साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. मोकळे केस, एका खांद्यावर हँडबॅग आणि लाल साडीमध्ये ती अप्सरासारखी सुंदर दिसत आहे. तिचा लूक पाहून रस्त्यावरील लोक आश्चर्याने बघत आहे. काही लोक तिला बघून थक्क झालेले दिसत आहे. एक वृद्ध महिला तिच्याजवळ येते आणि ‘सुंदर’ म्हणते. आणि तरुणीला पुढे म्हणते, “खूप जास्त ऑथेंटिक वाटत आहे. तुम्ही भारतीय आहात का?” त्यावर तरुणी सांगते, “हो, मी भारतीय आहे.” महिला ‘कूल’ म्हणत स्मित हास्य करत निघून जाते. काही वृद्ध पुरुष व महिला तिच्याकडे स्मित हास्य करताना दिसतात. त्यांना ही तरुणी दुरूनच हाय करते. रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांची तिच्यावरून नजर हटत नाही. अनेक जण तिला सुंदर म्हणत तिचे कौतुक करताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

himanshi_ksn या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” मी खूप थकलेली होती आणि अनेक प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करणे जमले नाही. पण हा अनुभव अविस्मरणीय होता.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यांना संस्कृतीचे महत्त्व माहिती आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “आपण खरंच आपले कपडे इतर देशात परिधान करायला पाहिजे. कारण हे खूप सुंदर आणि हटके आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, ” परदेशात साडी नेसून स्वतःची संस्कृती जपणे, खरंच खूप सुंदर गोष्ट आहे” अनेक युजर्सनी तरुणीला खूप सुंदर दिसत असल्याचे म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of indian girl when wear saree and walk around on a road of japan watch how japanese people reacted ndj