Viral Video : बालपण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय टप्पा असतो. बालपण आणि बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही पण आठवणी मात्र कायम मनात जिवंत असतात. पूर्वी टिव्ही किंवा मोबाईलपासून दूर असलेले चिमुकले बालपण मनसोक्त जगायचे पण आता तंत्रज्ञानाने बालपण मुलांकडून हिरावून घेतले आहे. हल्ली लहान मुलांकडून पालकांच्या अपेक्षा सु्द्धा वाढल्या आहे. जगातल्या स्पर्धेत आपलं मुल टिकायला हवं. यासाठी पालक मुलांना या स्पर्धेत उतरवतात आणि न कळत्या वयात त्यांच्या पाठीवर त्यांना सांभाळता येणार नाही असं ओझं देतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला शाळेच्या पायऱ्यावर बसून डुलकी घेताना दिसत आहे. तो खूप थकलाय असं, या व्हिडीओतून दिसून येत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक शाळा दिसेल. या शाळेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर एक चिमुकला बसला आहे. त्याच्या पाठीवर पुस्तकांनी भरलेली बॅग आहे तर गळ्यात पाण्याची बाटली लटकवली आहे आणि हा चिमुकला चक्क डुलकी घेताना दिसतोय. त्याला खूप झोप येत आहे, हे या व्हिडीओतून दिसून येईल.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की डुलकी घेताना या चिमुकल्याचा तोल सुद्धा जातो पण तो वेळीच जागा होतो आणि स्वत:ला सावरतो. या निरागस चिमुकल्याला पाहून कोणीही भावुक होईल.
या व्हिडीओवर लिहिलेय, “उद्याच्या स्पर्धेत माझं मुल टिकलं पाहिजे यासाठी त्यांना अगदी न कळत्या वयात तुम्ही त्यांना स्पर्धेत उतरवताय. बालपणाचा विचार केला तर तुमचं आमचं खरच सुंदर होतं”

पाहा व्हायरल व्हिडीओ

jaykar928 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजकाल पालक आपल्या लहानशा मुलांना अगदी २-३ व्या वर्षीच शाळेत टाकतात. त्यांना लिहायला, वाचायला, इंग्रजी शिकवायला लागतात.
म्हणजे काय? कारण स्पर्धा आहे!
पण त्या स्पर्धेत उतरवताना आपण त्यांच्या बालपणाचं काय करत आहोत?

या व्हिडिओतून मी दाखवलं आहे की बालपण ही स्पर्धा नाही, ती एक अनमोल भेट आहे. पालकांनी थोडं थांबावं, थोडं समजून घ्यावं… लहानग्यांना त्यांचं बालपण जगू द्यावं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारे पान म्हणजे बालपण” तर एका युजरने लिहिलेय, “मनाला लागलं सर … खरच कुठे तरी बालपण हरवलं आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पण हे 99.9% अती शिकलेल्या पालकांसाठी लागू होतय…” एक युजर लिहितो, “हे वय खेळण्याचं, पण टेन्शन मात्र मोठ्यांसारखं… काहीतरी चुकतंय आपल्याकडून” तर एक युजर लिहितोय, “मोठा झाल्यावर टेन्शन आहेच त्याला, निदान बालपण तरी जगु घ्या त्यांना” अनेक युजर्सनी मुलांना बालपण जगू द्या अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.