Viral Video Shows Grandparents Love : नातवाचा पहिला मित्र आजोबा आणि आजोबांचा शेवटचा मित्र म्हणजे नातू. या दोघांनाही एकमेकांची गरज असते. नातवंडांमुळे आजी-आजोबांचा वेळ जातो आणि नातवंडांना आई-बाबांची कमतरता भासत नाही. त्यामुळे एकत्र खेळणे, शाळेत सोडायला व आणायला जाणे, रात्री झोपताना गोष्टी सांगणे, गावी जाताना हातावर पैसे टेकवणे या सगळ्या गोष्टी आजी-आजोबा नातवंडांसाठी करत असतात. तर आज या नात्याचे वर्णन करणारा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत आजोबा आणि नातू खाटेवर बसलेले दिसत आहेत. यादरम्यान आजोबा वेडावाकडा चेहरा करून एका पायावर एक पाय ठेवतात. चिमुकला देखील हुबेहूब नक्कल करतो. त्यानंतर आजोबा पुन्हा गालावर हात ठेवून बसतात. तेव्हा चिमुकला सुद्धा त्यांचा अभिनय करतो. नंतर आजोबा जीभ दाखवून त्याला चिडवतात तेव्हा चिमुकला सुद्धा त्यांना तसेच करून दाखवतो. आजोबांची बसण्याची स्टाईल, त्यांचे हावभाव चिमुकला अगदी निरखून बघतो आणि हुबेहूब नक्कल करताना दिसतो.

आयुष्यातील सगळ्यात बेस्ट दिवस (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, दोघांनाही एकमेकांचा सहवास किती आवडतो आहे. दोघेही एकमेकांबरोबर हसत-खेळत आहेत. आजोबा एखादी बसण्याची स्टाईल किंवा हावभाव करून दाखवतात आणि मग चिमुकला अगदी हुबेहूब त्यांची नक्कल करताना दिसतो आणि नंतर अगदी लाडात येऊन त्यांच्या मांडीवर डोकं टेकवतो. एवढेच नाही तर त्याचे आपल्यावर असणारे प्रेम पाहून आजोबाही त्याला थोपटतात; जे पाहून तुम्हालाही लहानपणीचे दिवस आठवतील एवढे तर नक्की.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thefakemediia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आयुष्यातील सगळ्यात सुंदर नातं” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून अनेक जण त्यांच्या आजोबांच्या आठवणीत भावूक होताना दिसत आहेत. तसेच काही जण या व्हिडीओचे “चिमुकला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट दिवस जगतो आहे” अशा शब्दात नेटकरी कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.