जीवन अन् मृत्यूमध्ये जो काळ आपण जगतो तेवढेच आपले आयुष्य असते. जीव धोक्यात टाकून स्वत:च्या आयुष्याशी खेळ नका. मृत्यूला इतक्या हलत्यात घेऊ नये. काळ कधी कोठून येईल कोणी सांगू शकत नाही. हसता खेळता माणूस क्षणार्धात नाहीसा होतो. हे जीवनाचं सत्य आहे. याची प्रचिती देणारे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी प्राण्यांच्या शिकारीचे तर कधी भयावह अपघाताचे कित्येक व्हिडिओ समोर येतात. हे व्हिडिओ पाहून हीच शिकवण मिळते की,”आयुष्य म्हणजे खेळ नाही. वारंवार समोर येणारे व्हिडिओ पाहूनही लोकांना आयुष्याचे मोल समजत नाही. पुन्हा पुन्हा लोक तीच चूक करतात. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगाव काटा उभा राहीला आहे.

रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रचंड गर्दीमधून प्रवास करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. अनेकदा लोक दरवाज्यामध्ये लटकत, तर कधी धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात पण हीच चूक अनेकांच्या जीवावर बेतते ट्रेन-बसने प्रवास करणाऱ्यांना विसर पडतो की, एखादी ट्रेन किंवा बस सुटली तर पुढची मिळेल पण आयुष्य एकदाच मिळत.. एकदा जीव गेला तर तो पुन्हा मिळत नाही.

सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी अशाच प्रकारे धावत धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करते पण ट्रेनमध्ये चढण्याआधीच तिचा पाय घसरतो आणि ती स्थानकावर पडते. ती रेल्वेच्या चाकाखाली जाणार तेवढ्यात तिथेच उभा असलेला पोलिस अधिकारी तिच्या मदतीसाठी धावत येतो. तरुणीला पटकन मागे ओढतो ज्यामुळे तिचा जीव वाचतो. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाच्या प्रसंगावधान अन् कर्तव्यदक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. व्हायरल व्हिडिओ नागपूर येथील रेल्वे येथील स्थानकावरील असल्याचे सांगितले जाते.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रवाशांच्या अशा वर्तनावर रोष व्यक्त केला. एकाने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, डोळ्यात तेल घालून उभ्या असलेल्या पोलिसाचे कौतुक केले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्याने म्हटले की, “पडली तरी कानावरील मोबाईल हटेना, किती तो जीव मोबाईलमध्ये”